Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, २० ऑक्टोबर, २०२४

कोळेकर महास्वामींच्या हस्ते रविराज शेटे यांचा दिघंची मठात सत्कार संपन्न*

*कोळेकर महास्वामींच्या हस्ते रविराज शेटे यांचा दिघंची मठात सत्कार संपन्न*
सांगोला प्रतिनिधी :
        गुरु एक तुची माझा 
         विधाता अचल....
          गुरु विना सुने सारे 
           विश्व हे सकल 
          गुरुनिर्वाण रुद्र पशुपती कोळेकर महाराज ट्रस्टच्या वतीने व दिघंची ता. आटपाडी लिंगायत समाजाच्या वतीने गुरुमुर्ती रुद्र पशुपती कोळेकर महाराज 31वे मठाधिपती यांच्या शुभहस्ते मठाचे प्रसिद्धी प्रमुख रविराज शेटे यांची सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा भव्य सत्कार दिघंची मठात करण्यात आला. 
    सुरुवातीस प्रास्ताविक मठाचे मार्गदर्शक नानासो मेनकुदळे यांनी केले तर महास्वामींचा सत्कार समाजाचे अध्यक्ष कैवल्य शेटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मठाचे सचिव गणेश नकाते, आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके, पोपट काका मेनकुदळे, मुगेंद्र शेटे, योगेश स्वामी, शिक्षक प्रभुराज टिंगरे, राम कुंभार, अनिल टिंगरे, उद्योजक संजय दादा रायचुरे, रविराज स्वामी, रमेश भाऊ शिरदाळे, प्रणव राज शेटे इ. उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart