Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

ग्रामीण पत्रकार संघटनेचा आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न*




 *

ग्रामीण पत्रकार संघटनेचा आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न* 



सांगोला प्रतिनिधी 

        महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संचलित सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नुकत्याच निवडी संपन्न झाल्या, यामध्ये अध्यक्ष रविराज शेटे, उपाध्यक्ष दशरथ बाबर, सचिन धांडोरे, बबन चव्हाण, सचिव दत्तात्रय पवार, सखजिनदार समाधान धांडोरे, सदस्य निखिल काटे या सर्वांचा आमदार शहाजी बापू पाटील यांच्या शुभहस्ते त्यांच्या सांगोल येथील कार्यालयात सत्कार करण्यात आला. 


        ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटना अग्रेसर राहील तसेच वृत्तपत्र विक्रेत्याचे महामंडळ स्थापने कामी आमदार शहाजी बापू पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील तसेच ठाण्याचे आमदार केळकर साहेब यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच गेली पाच वर्षे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही आपल्या बातम्या प्रसिद्ध करीत आहोत व यापुढेही करू परंतु आपलेही सहकार्य संघटनेस राहावे असे मत नूतन अध्यक्ष रविराज शेटे यांनी याप्रसंगी व्यक्त केले. सदर प्रसंगी प्रा. संजय देशमुख, आनंद काका घोंगडे, शिक्षक नेते भारत इंगोले, सूर्यकांत पवार, अंबादास कदम, अनिल येडगे उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart