आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहरातील अनेक युवासेनेच्या शाखांचे उद्घाटन संपन्न.
*(आमदार शहाजीबापू पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव)
* सागर विजय माने लिखित आम. शहाजीबापू पाटील यांच्या कार्यावर आधारित ध्वनी गीताचे प्रसारण संपन्न
सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दि. 14 ऑक्टोबर 2024 रोजी सांगोला शहरात अनेक युवासेनेच्या शाखांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी आम.शहाजीबापू पाटील यांच्या कार्यावर आधारित सागर विजय माने लिखित ,निर्माता सुभाष जगदने ,गायक गरुडा गुलीक यांच्या टीमच्या ध्वनीगीताचा प्रसारण कार्यक्रम संपन्न झाला. आमदार शहाजी भाऊ पाटील यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक व शिवसेनेचे पदाधिकारी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे , विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, शिवसेनेचे ज्येष्ठनेते आनंदकाका घोंगडे यांनी शाखा उद्घाटन प्रसंगी सांगितले की ,स्व.बाळासाहेब ठाकरे ,स्व.धर्मवीर आनंद दिघे यांची प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ,आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला शहरात शिवसेनेच्या युवा शाखांचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन झाले. युवासेनेचे नूतन पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुढे येऊन धाडसाने कार्य करत राहावे .कार्यकर्त्यांच्या अडी अडचणी प्रसंगी शिवसेनेचे पदाधिकारी सर्वतोपरी सहकार्य व मदत करतील. या शाखांच्या माध्यमातून तसेच शिवसेनेच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी करणे हा दृष्टिकोन आहे. पक्ष शाखा हीच पक्षाची खरी ताकद आहे. शिवसेना शहर संघटक आनंदा माने मित्र परिवारांची टीम मोठी असून पक्षाला खऱ्या अर्थाने ताकद देण्याचे काम ही संघटना करणार आहे.आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगोला तालुक्याचा चौफेर विकास करण्यासाठी 5 हजार कोटीहून अधिक निधी मंजूर करून आणला. त्यामुळे गोरगरिबांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असून तालुक्यात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांना आमदार व नामदार करण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावूया असे आवाहन करण्यात आले
.
सांगोला शहरात युवासेनेच्या शाखांचा उद्घाटन सोहळा शिवसेनेतील मांन्यवर व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी युवासेना शाखेचे नूतन पदाधिकारी आमदार शहाजी बापू पाटील प्रेमी व आनंदा भाऊ माने मित्रपरिवार तसेच कार्यकर्ते नागरिक यांची उपस्थिती होती . युवासेना शाखांचे उद्घाटन युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, शिवसेना नेते दिग्विजयदादा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, शिवसेना विधानसभा प्रमुख प्रा. संजय देशमुख, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदकाका घोंगडे ,शिवसेना शहरप्रमुख माऊली तेली, शिवसेना शहर संघटक आनंदाभाऊ माने, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख राणीताई माने ,शिवसेना शहरप्रमुख महिला आघाडी छायाताई मेटकरी शिवसेना शहर उपप्रमुख अस्मिर तांबोळी, शिवसेना शहर उपप्रमुख विजय इंगोले, शिवसेना समन्वयक अरुण बिले ,शिवसेना शहरप्रमुख एस. सी सेलचे कीर्तीपाल बनसोडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ मगर ,एस.सी सेलचे शहर समन्वयक शरद रणदिवे, शिवसेना शहर उपप्रमुख गणेश माळी, शिवसेना शहर उपप्रमुख महेश कदम ,मायाक्का प्रतिष्ठानचे अध्यक्ष काशिलिंग गावडे, उद्योगपती सचिन सदगिले, उद्योगपती सुनील धतिंगे, शिवसेना शहर सहसंघटक अरुण पाटील, शिवसेना शहरप्रमुख ओबीसी सेलचे आयुब मुलाणी, देविदास गावडे ,ज्ञानेश्वर गाडेकर,अनेकयुवासेना शहर उपप्रमुख काशिलिंग गाडेकर, युवासेना शहर उपप्रमुख सागर नरुटे शिवसेनेचे दीपक ऐवळे, इनामदार गुरुजी, बिटू मुलाणी अण्णा गडदे, समाधान सावंत, सागर माने ,सुभाष जगधने मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यामध्ये सांगोला शहरातील युवासेना शाखा अहिल्यानगर, युवासेना शाखा जयभवानी चौक, युवासेना शाखा पुजारवाडी , युवासेना शाखा सनगरगल्ली, युवासेना शाखा इंदिरानगर वसाहत ,युवासेना शाखा वंदेमातरम चौक, युवासेना शाखा संजयनगर शाखा नं - 1 ,शिवसेना शाखा संजयनगर शाखा नं 2 ,युवासेना शाखा वाढेगाव नाका, युवा सेना शाखा आनंदनगर सांगोला या शाखांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी युवासेना शाखा पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला.
0 Comments