Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

प्रवाशी सेवा संघाच्या पाठपुराव्याला यश*

*प्रवाशी सेवा संघाच्या पाठपुराव्याला यश*

नाझरे प्रतिनिधी 
               नाझरे व परिसरातील प्रवाशांची म्हसवड गोंदवले व पुणे येथे जाण्यासाठी गैरसोय होत असल्यामुळे डायरेक्ट या भागातून पुणे बस सुरु व्हावी अशी अनेक दिवसापासून या भागातील प्रवाशाकडून एसटी महामंडळाकडे व प्रवाशी सेवा संघा कडे मागणी होत होती याबाबत नाझरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सह्याचे निवेदन श्री झाडबुके गुरुजी व पत्रकार रविराज शेटे तातोबा वाघमारे यांचेवतीने प्रवाशी सेवा संघ व एसटी महामंडळाकडे देण्यात आले होते याबाबत प्रवाशी सेवा संघांचे श्री संजय पाटील, नंदू दळवी, कुमार नरखडे यांनी महाव्यवस्थापक मुबई व विभाग नियंत्रक सोलापूर यांचेकडे पाठपुरावा करण्यात आला होता आज अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून दिनांक २६-१०-२०२४ पासून सांगोला पुणे स्वारगेट ही बस सांगोला स्थानकातून सकाळी ८ वा ३० मी सुटणार असून ती नाझरे आटपाडी दिघंची म्हसवड गोंदवले दहिवडी फलटण जेजुरी सासवड हडपसर पुणे स्वारगेट अशी सुरु होणार असून ती पुणे येथे दुपारी ३ वा ३० मी पोहचणार असून ती दुसऱ्या दिवशी पुणे येथून सकाळी ७ वा ३० मी सुटणार असून ती वरील मार्गे सांगोला येथे दुपारी २ वा पोहचणार आहे या भागातील प्रवाशांच्या मागणीचा विचार करून प्रवाशी सेवा संघाने पाठपुरावा केला तसेच सदरची सेवा सुरु करण्यास सांगोला आगार प्रमुख श्री पोपळे साहेब श्री पंकज तोंडे श्री पारसे श्री कदम साहेब व इतर सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल नाझरे व परिसरातील प्रवाशाकडून आभार मानले जात असून या सेवेमुळे आता डायरेक्ट पुणे येथे येजा करणे अंत्यत सोईचे झाले असून प्रवाशांनी खाजगी वाहनाने प्रवास नं करता नव्याने सुरु होत असलेल्या बसने प्रवास करावा असे आवाहन सांगोला आगाराकडून व प्रवाशी सेवा संघा कडून करण्यात येत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart