Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

वाटंबरे येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सेवा निवृत्त शिक्षकांचा सत्कार.

 वाटंबरे येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधत माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सेवा निवृत्त शिक्षकांचा सत्कार.




वाटंबरे / प्रतिनिधी :
 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा तस्मै श्री गुरुयन नमः
या शुभ मंत्राची आठवण 
 सांगोला तालुका वाटंबरे येथील सेवानिवृत्त शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना आली. श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे या प्रशालेत १९९२-९३  साली शिकणाऱ्या विद्यार्थ्यानी त्यांच्या यशात सिंहाचा वाटा असणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांचे सत्कार करण्याचे आयोजन केले . 
रविवार दि. 8 सप्टेंबर रोजी माजी विद्यार्थ्यांनी वाटंबरे येथील बाळासाहेब भगत यांच्या निवास स्थानी शिक्षक दिनाचे औचित्य साधत  सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल ,श्रीफळ, फेटा देऊन सत्कार केला.

या सत्कार समारंभ प्रसंगी सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी  विद्यार्थ्यांनी या केलेल्या अनोख्या सत्कार सोहळ्याचे कौतुक केले, विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनानिमित्त आम्हा सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना एकत्र आणुन आमच्या सर्व   शिक्षकांचा शिक्षण दिनानिमित्त सत्कार करत  आम्हाला विद्यार्थ्यांनी शिक्षण दिनानिमित्त एक वेगळी गुरु दक्षिणा भेट म्हणुन दिली सत्कार समारंभ प्रसंगी सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले.
या कार्यक्रमाला  श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेतील  सेवानिवृत्ती शिक्षिका बनसोडे मॅडम, सोनवणे मॅडम, चिंतामणी ढोले सर, शामराव कोळवले सर ,बि,एच, पवार सर, एन,एस, पवार सर, मोहन राऊत सर ,ज्ञानेश डोंगरे सर  के,वाय,पाटील सर, विभुते सर हे सर्व सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते तसेच १९९२-९३ या सालातील माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर या वेळी उपस्थित होते.


चौकट:
प्रशालेतुन शिक्षण घेवून विद्यार्थी बाहेर पडतो त्या वेळी तो त्याच्या संसारात गुरफुटूण जातो त्याच पद्धतीने शिक्षक हा शिक्षण क्षेत्रामधून सेवानिवृत्त होतो तो ही शिक्षण क्षेत्रापासून दूर जातो पण आज १९९२-९३ साली शिकणारे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन आम्हा सर्व प्रशालेतील सेवानिवृत्त शिक्षकांना शिक्षण दिनाचे औचित्य साधून आम्हा सर्व शिक्षकांना एकत्र आणण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले आहे सेवानिवृत्त शिक्षकांना एकत्र आणत माजी विद्यार्थ्यांनी शिक्षण दिनानिमित्त आम्हा सर्व शिक्षकांना वेगळ्या प्रकारची गुरूदक्षिणा भेट म्हणून दिली आहे. 
                            बि ,एच, पवार सर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart