Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

जय हनुमान गणेश मंडळ पवारवाडी यांच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन.

जय हनुमान गणेश मंडळ पवारवाडी यांच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन.


सांगोला तालुका वाटंबरे येथील विविध उपक्रमाच्या माध्यमातून गणेश उत्सव साजरा करणारे जय हनुमान गणेश मंडळ यांच्यावतीने या वर्षी बुधवार दि.११ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवाडी या ठिकाणी प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सांगोला पोलीस स्टेशनचे हवालदार अनिल बनसोडे ग्रामपंचायत सरपंच नामदेव पवार ,उपसरपंच मोनिका निकम सर्व ग्रामपंचायत सदस्य व वाटंबरे ग्रामस्थ यांच्या उपस्थित होणार आहे.
या स्पर्धेतील विजेत्यांना उद्योजक अमोल पवार, सोसायटी चेअरमन खंडू पवार , गोविंद दशरथ जाधव (शेठ), यांच्या तर्फे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच नारायण पवार सर यांच्या वतीने ट्रोफी देण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे संयोजक प्रतीकदादा पवार व धर्मराज पवार सर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart