Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, ९ सप्टेंबर, २०२४

सांगोला महाविद्यालयात “ राजे उमाजी नाईक ” यांची जयंती साजरी

सांगोला महाविद्यालयात “ राजे उमाजी नाईक ” यांची जयंती साजरी


सांगोला/प्रतिनिधी:

          सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्यालयामध्ये शनिवार दि.7 सप्टेंबर 2024 रोजी “ राजे उमाजी नाईक ” यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांचे हस्ते राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

     यावेळी महाविदयालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले यांनी राजे उमाजी नाईक यांच्या विषयीची माहिती देताना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटीशा विरुध्द लढणारे महाराष्ट्रातील आदय क्रांतीकारक होते. त्याच बरोबर त्यांचे विचार व कार्य याविषयी थोडक्यात माहिती यावेळी दिली. आजच्या काळात राजे उमाजी नाईक यांच्या विचारांची गरज असून, त्यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकाने करावे असे मत व्यक्त्‍ केले.

     यावेळी महाविदयालयातील कार्यक्रमाचे आयोजन डॉ. अमोल पवार, श्री. राहुल ढोले व श्री. शंकर माने यांनी केले. यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेसह विदयार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart