Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे कोळेगाव येथे प्रबोधन*

 *गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे कोळेगाव येथे प्रबोधन* 



.नाझरे / प्रतिनिधी 

           श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या कृपाशीर्वादाने जगात एकच कर्तव्य शिल्लक उरली आहे व ते म्हणजे परमेश्वराला म्हणजे गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराजांना त्यांच्या नामस्मरणाने संतोष करणे व कर्तव्याचा सदा ध्यास लागून ते आचरणात आले पाहिजे. 

        जगाच्या संसारातील व परमार्थातील आपली ओळख सद्गुरु करून देतात व त्याचाच नित्य ध्यास धरल्याने एक दिवस परमेश्वराची व आपली संपूर्ण ओळख होती व यासाठी ज्ञानेश्वर माऊली मंदिर कोळेगाव ता. माळशिरस येथे रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते सहा या वेळेत गुरुवर्य भालचंद्र पाटील काका यांचे प्रबोधन आयोजित केले आहे असे गुरु नरसिंह स्वामी भक्त संतोष दादा पाटील यांनी सांगितले. सदर प्रबोधनास उपस्थित राहावे व गुरुभक्तीचा महिमा कसा आहे व त्याची प्रचिती कशी येते हे समजून येईल तरी स्वामी भक्तांनी हजर राहावे असे आव्हान समस्त श्री दत्त सेवेकरी कोळेगाव व जगदीश बेंदगुडे, गोरख कचरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart