Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४

पेन्शनर संघटनेचे सल्लागार शंकर सावंत गुरुजी व प्राचार्य बाळासाहेब शिंदे या सासरे, जावई यांना सूर्योदय परिवाराकडून सन्मानित*

*पेन्शनर संघटनेचे सल्लागार शंकर सावंत गुरुजी व प्राचार्य बाळासाहेब शिंदे या सासरे, जावई यांना सूर्योदय परिवाराकडून सन्मानित* 
नाझरे प्रतिनिधी 
       पेन्शनर संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार शंकर सावंत गुरुजी तसेच त्यांचे जावई प्राचार्य बाळासाहेब शिंदे यांना सूर्योदय परिवाराच्या वतीने सन्मानित केले असून, सासरे व जावई यांचा एकत्रित सत्कार करण्याचा दुग्ध शर्करा योग आल्याचे सूर्योदय परिवाराचे प्रमुख अनिल भाऊ इंगवले यांनी सांगितले. 
        सासरे, जावई यांचे शैक्षणिक व सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात योगदान असून, त्यांची दखल सूर्योदय परिवाराच्या वतीने घेतली असून शंकर सावंत गुरुजी यांना जीवनगौरव व प्राचार्य बाळासाहेब शिंदे यांना आदर्श मुख्याध्यापक, प्राचार्य म्हणून सूर्योदय परिवाराच्या वतीने गौरविण्यात आले आहे. अध्यक्ष अनिल भाऊ इंगवले, उपाध्यक्ष जगन्नाथ भगत गुरुजी, सुभाष दिघे गुरुजी, बंडोपंत लवटे गुरुजी, प्रमुख पाहुणे कवी इंद्रजीत भालेराव व मा. नगराध्यक्ष प्रा. पी. सी.झपके सर यांच्या शुभहस्ते सावंत व शिंदे यांना गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart