Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०२४

महिला पोलिसाच्या मदतीला बाळासाहेब गेले धावून; बाळाला घेऊन गाठले हॉस्पिटल!

महिला पोलिसाच्या मदतीला बाळासाहेब गेले धावून; बाळाला घेऊन गाठले हॉस्पिटल!
(कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी..
हृदयातील भगवंत राहिला हृदयात उपाशी!)
सांगोला ( प्रतिनिधी )- भगवंताला शोधण्यासाठी काशी रामेश्वर करण्यापेक्षा एकमेकांच्या मदतीला धावूनच आपण भगवंत शोधला पाहिजे हा बोध कालच्या प्रसंगातून बाळासाहेब सावंत यांनी सर्वाना दिला आहे
         पंढरपूर तालुक्यातील तपकीर शेटफळ येथे आपल्या माहेरी आलेल्या व सांगली येथे पोलीस पदावर कार्यरत असणाऱ्या सौ .महानोर ह्या महिला धाराशिव - लांजा एसटी बसने सांगलीला निघाल्या होत्या. सांगोला बसस्थानाकावर बस थांबली असता त्यांचे लहान बाळ बेशुद्ध पडले. आवाज देऊनही उठत नसल्याने त्या घाबरल्या. बाळ हाकेला प्रतिसाद देत नाही म्हटल्यानंतर आई बाळाच्या काळजीने हंबरडा फोडून राहिली. मोठमोठ्याने ओरडत असताना कोणी तर मदतीला येईल या अपेक्षेने रडू लागल्या. परंतु बसस्थानकात सर्वजण नुसते पाहत होते. परंतु मदतीला पुढे कोणीच येत नव्हते.
         सांगोला बस स्थानकामध्ये हा प्रसंग घडत असताना श्री बाळासाहेब सावंत हे आपल्या ऑफिस च्या कामकाजासाठी जुनोनी या ठिकाणी त्याच बसमध्ये निघाले असताना बस मध्ये मोठमोठ्याने ओरडण्याचा व रडण्याचा आवाज त्यांनी ऐकला. नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारे सावंत यांनी प्रसंगावधान ओळखून तत्काळ ते बाळ व महिला यांना घेऊन स्वतः फुले चौकातील डॉक्टर संदीप देवकते यांचं हॉस्पिटल मध्ये दाखल झाले. 
डॉ. देवकते दांपत्यांनी तातडीने त्या बाळाला औषधोपचार चालू केले व ते बाळ शुद्धीवर आले.
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " सामान्य नागरिकांच्या संकटात मदतीला धावून जाणाऱ्या महिला पोलिसाने मात्र आज बाळासाहेबांच्या रूपात त्यांनी देवमाणूस पाहिला. त्यांच्या बाळाला तत्काळ दवाखान्यात दाखल करून वेळेत उपचारास मदत केल्यामुळे ते बाळ शुद्धीवर आले. त्याबद्दल मातेने बाळसाहेबांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart