Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

राज योगी रंगनाथ स्वामी गणेश मंडळातर्फे भजन स्पर्धेचे नाझरे येथे आयोजन*

*राज योगी रंगनाथ स्वामी गणेश मंडळातर्फे भजन स्पर्धेचे नाझरे येथे आयोजन*

नाझरे प्रतिनिधी 
         राज योगी रंगनाथ स्वामी प्रतिष्ठान श्री गणेशोत्सव मंडळ नाझरे ता. सांगोला यांचे तर्फे रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले. 
        कै.ह.भ.प. शारदा देवी काकासो साळुंखे पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य बक्षीस, यामध्ये प्रथम बक्षीस 10,601, द्वितीय 6601 तर तृतीय 3601 आहे. सदर स्पर्धेसाठी शनिवार 14 सप्टेंबर 2024 पूर्वी नाव नोंदणी ओंकार देशपांडे मोबाईल नंबर 95 526 10 601, सारंग देशपांडे 940 31 81 888 व सचिन देशपांडे 98 60 707 637 या व्हाट्सअप मोबाईल नंबर वरती करणे गरजेचे आहे. स्पर्धेसाठी सदस्य संख्या सात ते अकरा व गायनासाठी पंधरा मिनिटे वेळ राहील व यासाठी आपले वाद्य व वादक आणावेत. 
       प्रत्येक भजनी मंडळाने राम कृष्ण हरी, एक अभंग व गवळण गाथ्यामधील म्हणणे आवश्यक आहे व सदस्याला एकाच मंडळात सहभाग घेता येईल व यासाठी ड्रेस कोड शक्यतो असावा. स्पर्धकास फी नाही व येण्या जाण्याचा प्रवास खर्च आयोजक देणार नाही . तसेच रविवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सहभागी मंडळांनी सकाळी नऊ वाजेपर्यंत राजयोगी रंगनाथ स्वामी प्रतिष्ठान गणेश उत्सव मंडळ नाझरे ता. सांगोला येथे हजर राहावे व नोंदणी नुसार टोकन नंबर देऊन स्पर्धा सुरू होतील याची भजनी मंडळाने नोंद घ्यावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart