श्री समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी चे उद्घाटन.
श्री समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरी चे उद्घाटन.
सांगोला तालुका वाटंबरे येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शुभम खंडागळे यांनी चालू केलेल्या श्री समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरीचे उद्घाटन
वाटंबरे गावचे प्रथम नागरिक सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले तसेच डॉ. चंद्रशेखर घाटोळे यांच्या हस्ते फित कापण्यात आली यावेळी डॉ.सदाशिव दबडे ,डॉ सौ.प्रणिता पवार उपस्थित होते.
वाटंबरे येथे शुभम खंडागळे यांनी चालू केलेल्या श्री समर्थ क्लिनिकल लॅबोरेटरीमुळे वाटंबरे गावच्या आरोग्य सेवेमध्ये मोठ्या प्रमाणावर भर पडलेली आहे तसेच या लॅबोरेटरी मुळे रुग्णांच्या आजाराचे लवकरात लवकर अचूक निदान होणे सोपे झाले आहे वाटंबरे, य.मंगेवाडी, चिणके, राजुरी , निजामपुर, अनकढाळ या गावातील नागरिकांना शुगर, बीपी तसेच रक्तातील विविध आजार तपासण्यासाठी या लॅबोरेटरी चा उपयोग होणार आहे असे उपस्थित डॉक्टरांनी उद्घाटन प्रसंगी म्हटले.
या उद्घाटन सोहळ्यास सोसायटी चेअरमन नाना बापू पवार, माजी सरपंच नामदेव पवार , माजी ग्रामपंचायत सदस्य सुब्राव बापू पवार, तालुका नियोजन समिती सदस्य विजय पवार, जलतज्ञ मधुकर पवार, समाजसेवक महादेव बापू पवार, माजी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय पवार, नारायण पवार, उद्योजक मोहन पवार, हणमंत निकम सर ,पिंटू पवार सर ,खंडागळे सर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रतीक दादा पवार, लव्ह पवार, सुभाष पाटोळे, विजय पवार, बंडू पवार, तसेच वाटंबरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments