Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

नाझरे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा.

 नाझरे येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा.


नाझरे प्रतिनिधी

           भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, अक्कलकोट निवासी राजाधिराज स्वामी समर्थ महाराज की जय या जयघोषात नाझरे येथे स्वामीभक्त माणिक स्वामी व सुधाकर कुंभार यांच्या घरी स्वामी चा प्रकट दिन साजरा करण्यात आला.

              सदर प्रसंगी बलवडी, नाझरे येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर नामस्मरण व दुपारी साडेबारा वाजता पुष्पांजली करण्यात आली. तसेच शिवानंद स्वामी सौ रोहिणी स्वामी, लिंग या स्वामी, सौ सोनाली स्वामी, महेश कुंभार यांच्या शुभहस्ते महास्वामींची महाआरती करण्यात आली. तसेच महाप्रसाद वाटप करण्यात आला.


         ‌ श्री स्वामी समर्थ शरीराने तुमच्या मध्ये नसले तरी नामस्मरण रूपाने जिवंत आहे व यासाठी सर्वांनी नामस्मरण करा म्हणजे संकट समय स्वामी धावून येतील व स्वामी अभि गये नही अभी भी जिंदा है.

                        *स्वामीभक्त माणिक स्वामी*

No comments