वनविभाग सांगोला सिंघम अधीकारी तुकाराम जाधवर यांची अवैध कोळसा वाहतूक करणाऱ्या आयशर टेंपो वर कारवाई.
वनपरिक्षेत्र सिंघम अधिकारी तुकाराम जाधवर यांनी सांगोला येथे विनापरवाना कोळसा वाहतूक करणारा आयसर क्र.MH 45 A 8275 कोळसा पोती 360 मालासह जप्त करून कारवाई केली.
वनपरिक्षेत्र सांगोला मध्ये दिवसा फिरती करत असताना सांगोला नियतक्षेत्रात मौ. वाढेगाव ते पुणे रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली या वेळी सदर वाहनाची तपासणी केली असता यामध्ये अवैध वाहतूक कोळशाची 360 पोती मिळून आली. सदर आयसर काळ्या ताडपत्रीने बांधून वाहतूक करित होता. वाहन चालक आप्पासो रामचंद्र काकडे रा. जवळा यांना वनपाल सांगोला यांनी कोळसा वाहतूक पास परवाना विचारला असता कोळसा वाहतूक करणेसाठी माझ्याकडे वनविभागाचा वाहतूक पास नाही असे सांगितले. सदर कोळसा पोती 360 वाढेगाव येथून पुणे येथे अवैध वाहतूक होत असल्यामुळे आयसरमधील कोळसा पोती 360 सह वाहन जप्त करत वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला कार्यालयाशेजारी वाहन आणण्यात आले आहे. जप्ती पंचनामा करून वाहन ताब्यात घेतले आहे. सदर वाहन चालक आप्पासो काकडे यांनी सांगितले कि, सदर कोळसा पोती 360 हि सचिन बंडगर रा.अनकढाळ कोळसा व्यापारी यांची आहेत मी वाहतूक भाडे करित आहे. अवैध कोळसा पोती 360 त्याचे वजन 9000 कि.ग्रॉ. आहे. तसेच 360 कोळसा पोती बाजारभावप्रमाणे अंदाजे किंमत दोन लाख रु. होईल. सदरचा कोळसा हा मालकी क्षेत्रातील आहे. वाढेगाव येथे वनविभागाचे वनक्षेत्र नाही. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर करत आहेत.
चौकट:
वृक्षतोडीसाठी वृक्षतोड परवाना घेणे, वाहतूक करणेसाठी वनविभागाचा वाहतूक पास घेणे व कोळसा वाहतूक करणेसाठी वनविभागाचा वाहतूक पास घेणे आवश्यक आहे. वृक्षतोड परवाना नसेल व वाहतूक पास नसेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला तुकाराम विठ्ठल जाधवर यांनी सांगितले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा