आदर्श माता पुरस्काराने रूपाली खरात सन्मानित.
पुणे/प्रतिनिधी : झेप फाउंडेशनच्या रूपाली खरात खडकवासला विधानसभा सचिव यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत सिंहगड रोड विठ्ठलवाडी नित्यानंद हॉल येथे आदर्श माता हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याचे :संस्थापक अध्यक्ष, तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव, युवा ग्रामीण पत्रकार संघटना पश्चिम महाराष्ट्र उपविभाग प्रमुख, बाळकडू दैनिक वृत्तपत्र: पत्रकार पुणे उपजिल्हाप्रमुख व लक्ष्मण माताळे सर, शशिकला दुधनकर मॅडम, सुनील ढमाले सर, इंदुमती राठोड मॅडम, तसेच वासवंती पटवर्धन, रूपाली खरात, डॉ स्मिता भंगाळे ,प्रणिता कांबळे, शशिकला दुधनकर मॅडम ,शकुंतला तोटे मॅडम, अलका मुसळे, अंजली दरवेश मॅडम, वेगवेगळ्या क्षेत्रातील 20 महिलांना आदर्श माता सन्मानपत्र वाटप करण्यात आले .
महिला सबलीकरणाच्या उद्देशाने ज्या महिला आपल्या गरीबी वरती मात करून आपल्या मुलाबाळांना एक खंबीर साथ देऊन त्यांना डॉक्टर ,वकील ,पोलीस सरकारी मोठ्या पदावरती ऑफिसर बनवण्यासाठी काबाड कष्ट करून जी मेहनत घेतलेली आहे आशा मातांचा समाजामध्ये दुसऱ्या महिलांनी आदर्श घ्यावा म्हणून त्यांना आदर्श माता सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.
पहिल्या काळामध्ये महिलांच्या वरती भरपूर निर्बंध होते सध्याच्या युगामध्ये परिस्थिती वेगळी आहे महिलांना उद्योग धंदे करण्यासाठी, शिक्षणासाठी भरपूर सुख सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत या सुविधांचा उपयोग करून संधीचे सोने करावे व आपले आयुष्य एक चांगल्या पद्धतीने जगता यावे या उद्देशाने महिलांनी प्रयत्न करावेत व स्वतःच्या पायावरती उभे राहावे .
कार्यक्रमाच्या शेवटी रूपाली खरात मॅडम यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा