वाटंबरे येथे मराठा योद्धा मनोज जरांगे यांचे जंगी स्वागत.
{वाटंबरे करांच्या पाहुणचाराने मनोज जरांगे पाटील गेले भारावुन}
वाटंबरे /प्रतिनिधी: सोमवारी सोलापूर मार्गे कर्नाटक येथील बेळगाव येथे गाव भेटी दरम्यान जाहीर सभेला जात असताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील याची सांगोला येथे बैठक आयोजित केली गेली होती या बैठकीला संबोधित करुन ते बेळगावला जात असताना त्यांचा वाटंबरे येथे दि.२९ एप्रिल सोमवारी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.स्नेहभोजनासाठी वाटंबरे येथे आले असता त्यांचे मराठा समाजाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा समाजातील महिला पुरुष त्यांचे स्वागत करण्यास उपस्थित होते महिलांच्या हस्ते औक्षण करत त्यांचे स्वागत करण्यात आले प्रथम त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी हजारोच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला यावेळी त्यांची गावातून रॅली काढण्यात आली या वेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला . श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज या प्रशालेमध्ये त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली गेली होती यावेळी त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी व मनोज दादानी येथे भोजनाचा आस्वाद घेतला.
या वेळी वाटंबरे ग्रामस्थांच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा गावचे सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते त्यांचा पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सकल मराठा समाज वाटंबरे यांनी केलेल्या या नियोजनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा