Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, ३० एप्रिल, २०२४

उदनवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आनंदमय व भक्तिमय वातावरणात साजरा.

उदनवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आनंदमय व भक्तिमय वातावरणात साजरा.

उदनवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 22 वे दिनांक 23 एप्रिल 2024 ते दिनांक 30एप्रिल 2024 या कालावधीमध्ये ह. भ. प . प्रभाकर आप्पा शेडसाळे महाराज यांच्या प्रेरणेने संपन्न झाला या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक व सूत्रसंचालक म्हणून ह .भ. प एकनाथ गायकवाड महाराज शेटफळे यांचे सहकार्य लाभले .या अखंड हरिनाम सप्ताह मध्ये मध्ये रोज सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ व संध्याकाळी किर्तन असे भक्तीमय कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उदनवाडी व उदनवाडी परिसरातील सर्व भाविक भक्त , माता-भगिनी, लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले व भक्तीचा महिमा जाणून घेतला. मंगळवार दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी काल्याचे किर्तन व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली . अखंड हरिनाम सप्ताहा मुळे सर्व उदनवाडी गाव भक्तिमय झाले होते. अखंड हरिनाम सप्ताहा मुळे सर्व समाज एकत्र येऊन सामाजिक एकता साधण्याचे काम झाले. हा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी उदनवाडी व उदनवाडी परिसरातील सर्व भाविक भक्त, माता-भगिनी, लहान थोर मंडळी, हनुमान मंडळातील सर्व सदस्य, हनुमान भजनी मंडळ उदनवाडी , एकता भजनी मंडळ उदनवाडी,नवतरुण मंडळ उदनवाडी, गावातील सर्व युवक यांनी विशेष परिश्रम घेऊन सहकार्य केले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart