गावठाण अंगणवाडी मध्ये प्रोटीन डब्यांचे वाटप.
गावठाण अंगणवाडी मध्ये प्रोटीन डब्यांचे वाटप.
फोटो: गावठाण अंगणवाडी येथील बालकांना प्रोटीन डबे वाटप करत असताना अंगणवाडी सेविका शारदा माळी, बालक व पालक.वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथे दि २३ एप्रिल मंगळवारी गावठाण अंगणवाडी येथील बालकांना प्रोटीन डब्याचे वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत वाटंबरे यांच्या वतीने पंधराव्या वित्त आयोग निधीतून या निधीची तरतूद केली गेली होती. गावातील सर्व अंगणवाड्याना या प्रोटीन डब्याचे ग्रामपंचायतच्या वतीने वाटप करण्यात आले होते. यावेळी गावठाण अंगणवाडी येथील अंगणवाडी सेविका शारदा माळी यांनी तीन ते सहा वर्षा पर्यंत वजनाने कमी असणाऱ्या बालकांना या प्रोटीन डब्याचे वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले.
चौकट: पंधराव्या वित्त आयोगामधून तीन ते सहा वर्षापर्यंतच्या वजनाने कमी असणाऱ्या अंगणवाडी मधील बालकांना या निधीची तरतूद केली गेली आली होती या निधी अंतर्गत गावातील सर्व अंगणवाड्यांना प्रोटीनच्या डब्याचे वाटप करण्यात आले आहे.
सरपंच
नामदेव पवार.

No comments