पौर्णिमे निमित्त वाटंबरे येथील माणकेश्वर, दत्तमंदिरात भजण, किर्तन आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.
पौर्णिमे निमित्त वाटंबरे येथील माणकेश्वर, दत्तमंदिरात भजण, किर्तन आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न.
वाटंबरे /प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे माण नदीच्या तीरावर असलेल्या माणकेश्वर व दत्त मंदिरात दि २३ एप्रिल मंगळवारी पौर्णिमेनिमित्त भजन , किर्तन,आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला .या मंदिरात नित्यनेमाने महिन्यात येणार्या पौर्णिमेला भजन ,आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.
जर त्या पौर्णिमेला वेगवेगळ्या भक्ताकडून मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप केले जात असते. या पौर्णिमेचे महाप्रसादाचे मानकरी बालाजी मुरलीधर पवार हे होते. वाटंबरे ग्रामस्थ यांच्याकडून नित्यनेमाने महिन्याच्या पौर्णिमेला होणाऱ्या भजन,आरती व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आव्हान भक्तांना करण्यात आले.


No comments