Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, २७ एप्रिल, २०२४

तरसंघटना" या सामाजिक चित्रपटाच्या शूटिंगला वाटंबरे येथे सुरुवात.

 "तरसंघटना" या सामाजिक चित्रपटाच्या शूटिंगला वाटंबरे येथे सुरुवात.



 वाटंबरे /प्रतिनिधी: निर्माता ,सिने अभिनेते, दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड यांच्या सामाजिक  विषयावरील "तरसंघटना" या चित्रपटाच्या शूटिंगला वाटंबरे येथील जागृत  खंडोबा देवस्थान यात्रेनिमित्त वाटंबरे  परिसरात सुरुवात करण्यात आली.

या वेळी सिने अभिनेते दिग्दर्शक सर्जेराव गायकवाड म्हणाले  खंडोबा देवस्थान हे आमचे कुलदैवत असल्याने मि वेळोवेळी दर्शनाला येत असतो यावेळी खंडोबा देवाचे पुजारी व ग्रामस्थांकडून मला वाटंबरे देवस्थान व   परिसरामध्ये गावातील कलाकारांना चित्रपटात संधी देत शूटिंग करण्याचा आग्रह केला जात होता  .आज मी सामाजिक विषयावरील "तरसंघटना" या चित्रपटाच्या माध्यमातून मी माझा शब्द पूर्ण केला आहे तसेच गावातील उद्योजक बाळासाहेब भगत यांचे मोठ्या प्रमाणावर आम्हाला या चित्रपटासाठी सहकार्य लाभलेला आहे तसेच भविष्यात पुढील होणारे चित्रपटाचे शूटिंग स्थानिक कलाकारांना संधी देत वाटंबरे परिसरामध्ये करू असे ते म्हणाले . सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांचे सुपूत्र दिग्विजय पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व सिने कलावंताचे व दिग्विजय पाटील यांचे वाटंबरे गावच्या वतीने सत्कार करण्यात आला गावचे सरपंच नामदेव पवार, मा. उपसरपंच सुब्राव पवार, विजय पवार ,मधुकर पवार, बाळासाहेब भगत, महादेव पवार ,विकास पवार मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. 


या चित्रपटात सिने अभिनेते प्रशांत बोधगिरे, काजल शिंदे, अनिता आवळे,  रेणू राजपूत, कॅमेरामन भरत फरांडे, चंद्रकांत येवल, ओंकार येवल, दया कोलम तसेच लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील  काम करणार आहेत असे सर्जेराव गायकवाड  म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart