जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांचा सन्मान.
{ रूपाली खरात यांना "ती " चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले }
पुणे/प्रतिनिधी : रविवार १० मार्च रोजी अहमदनगर येथे ए आर न्यूज चॅनल तर्फे लेडीज स्पेशल प्लॅटफॉर्म मध्ये झेप फाउंडेशन पुणे च्या खडकवासला विधानसभा सचिव रूपाली सुहास खरात मॅडमचा "ती" चा सन्मान पुरस्कार अभिनेता मोहीनीराज गटणे यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे ऐआर न्यूज चॅनलच्या मुख्य संपादिका श्रुती बोजा मॅडम व रोहित गांधी सर मार्केटिंग मॅनेजर व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते यावेळी जवळजवळ १०० महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून महिलांची निवड करण्यात आली होती. संगीता खिलारे ,सुरेखा तोरडमल, संगीता गुरव, निर्मला खरात इत्यादी
विविध क्षेत्रातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने महिलांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले असे विविध प्रकारचे कार्यक्रम ऐआर न्यूज चॅनल तर्फे राबवले जातात असे पत्रकाराशी बोलताना मुख्य संपादिका श्रुती बोजा मॅडम यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा