Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १३ मार्च, २०२४

सामाजिक कार्यकर्त्या भाजपा महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन

 सामाजिक कार्यकर्त्या भाजपा महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या विविध विकास कामांचे  भूमिपूजन.



सांगोला तालुक्यातील विविध गावांमध्ये सामाजिक कार्यकर्त्या, भाजपा महिला प्रदेश कार्यकारणी सदस्या मा. सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने भूमिपूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. यामध्ये प्रथम उदनवाडी या गावांमध्ये मा. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या सहकार्याने, व सामाजिक कार्यकर्ते भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग सांगोला तालुकाध्यक्ष मा. विकास दत्तात्रय वलेकर सर यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर झालेल्या1) उदनवाडी स्टॅन्ड ते ग्रामपंचायत रस्ता काँक्रिटीकरण करणे. 7 लाख रुपये2) मायाक्का देवी मंदिर ते वत वस्ती पथदिवे बसवणे. 7 लाख रुपये या दोन्ही विकास कामांचा शुभारंभ मा. सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

सदर कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष मा. दिलीप सावंत,  भाजपा सांगोला तालुका अध्यक्ष मा. अतुल (मालक) पवार , भाजपा ज्येष्ठ नेते शिवाजी आण्णा गायकवाड , मा. नवनाथ(भाऊ) पवार , भाजपा माजी महिला तालुकाध्यक्ष मा.मनीषा ताई आलदर , मा.विशाल कुलकर्णी, तसेच उदनवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर बुद्धीहाळ येथे मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या सहकार्याने व बुद्धिहाळ गावचे भाजपा नेते मा. संतोषभाऊ काळे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या होलार समाज मंदिर ते हनुमान मंदिर या रस्त्याचे काँक्रेटी करण करणे या विकास कामाचा शुभारंभ मा. सौ राजश्रीताई नागणे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या ही कार्यक्रमासाठी मा. सौ.मनीषाताई आलदर बुद्ध्याहाळ गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामस्थ, सर्व मान्यवर उपस्थित होते.

त्यानंतर चोपडी येथे मा. सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या विशेष सहकार्यातून व चोपडी गावचे भाजपा नेते मा. विनायक बाबर यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 1 कि.मी. पानंद रस्त्याचे भूमिपूजन मा. सौ राजश्रीताई नागणे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी भाजपच्या महिला माजी तालुकाध्यक्षा मा. सौ. मनीषा ताई आलदर सर्व मान्यवर, चोपडी गावातील ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर नाझरा येथे मंजूर झालेल्या  पथदिवे बसवणे या14 लाखाच्या विकास कामांचा शुभारंभ मा. सौ राजश्रीताई नागणे पाटील यांच्या शुभहस्ते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी,मा. सौ.मनीषा ताई आलदर सर्व मान्यवर सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर बलवडी येथे मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या सहकार्याने व बलवडी गावचे भाजपचे नेते मा. फैजुदिन शेख यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या 1 कि.मी. पानंद रस्त्याचे भूमिपूजन मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मा. सौ मनीषा ताई आलदर, सर्व मान्यवर,बलवडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर महूद येथे मंजूर झालेल्या1) महूद गार्डी हद्द ते भाकरे वस्ती रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 50 लाख रुपये. या विकास कामाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात व आनंदात मा. सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी मा. सौ मनीषा ताई आलदर ,सर्व मान्यवर, महूद गावातील सरपंच ,उपसरपंच, भाजपा, तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यानंतर बामणी येथे मा. सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या सहकार्याने व बामणी गावचे भाजपचे नेते मा. विशालभाऊ कुलकर्णी यांच्या प्रयत्नाने मंजूर 66  लाख रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन त्यामध्ये 1) नागेश माने ते नलवडे घर रस्ता काँक्रेटीकारण करणे 20 लाख रुपये2) नाथपंथी समाज मंदिर ते धनाजी माने घर रस्ता डांबरीकरण करणे 10 लाख रुपये 3) जाधव वस्ती रस्ता खडीकरण लाख रुपये 4) कोळेकर वस्ती रस्ता खडीकरण करणे 18 लाख रुपये मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमासाठी, भाजपचे ज्येष्ठ नेते मा. शिवाजी अण्णा गायकवाड, मा. विकास वलेकर, भाजपच्या महिला माजी तालुकाध्यक्षमा.सौ. मनीषाताई आलदर सरपंच, भाजपचे  नेते मा. मानस कमलापुरकर, प्रवीण जानकर, बामणी गावचे भाजपचे नेते विशाल भाऊ कुलकर्णी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामस्थ  महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये विकास कामे करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सर्व कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांनी येणाऱ्या काळामध्ये पक्षभेद न करता सांगोला तालुक्यातील सर्व गावांचा विकास करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावातील, रस्ते, पाणी, विज, तळागाळातील लोकांच्या समस्या, यावर सर्व कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केले पाहिजे. माझे कायम सर्वांना सहकार्य राहील असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावामध्ये मा.सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांचे उत्साहात व आनंदात स्वागत करण्यात आले. तसेच त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी प्रत्येक गावातील ग्रामस्थ महिला व युवक , भाजपचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, सर्व सर्व पक्षीय सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart