Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, १३ मार्च, २०२४

कु.अद्विका चे राज्यस्तरीय प्रि स्कुल लीग या परीक्षेत घवघवीत यश.

 कु.अद्विका चे राज्यस्तरीय प्रि स्कुल लीग या परीक्षेत घवघवीत यश.



मास्टरमाईंड या संस्थेने घेतलेल्या राज्यस्तरीय प्रि स्कूल लीग  या परीक्षेत पुणे येथील अधिरा इंटरनॅशनल स्कूल सिनियर केजी या शाळेतील पाच वर्षाच्या अद्विका या विद्यार्थिनीने  गणिताच्या परीक्षेत राज्यात पाचवा व इंग्रजी मध्ये सहावा क्रमांक  मिळवत घवघवीत यश प्राप्त केले आहे . तसेच आता तिची राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी निवड झाली आहे. अद्विका  हिचे मुळगाव सांगोला तालुका वाटंबरे येथील असून आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे सचिव हणमंत पवार सर यांची ती नात असुन तसेच पुणे येथे डॉक्टर म्हणून कार्यरत असणारे विक्रम पवार यांची ती मुलगी आहे.

तिने मिळवलेल्या या यशामुळे  तिचे शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग  तसे तिच्या मूळ गावी वाटंबरे येथे सर्व नागरिकांमधून तिचे कौतुक केले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart