विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अति वापर टाळावा : न्यायाधीश एस एम घुगे.
{जागतिक महिला दिनानिमित्त वाटंबरे येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर.}
वाटंबरे /प्रतिनिधी: शालेय जीवनामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अति वापर टाळावा, मोबाईलचा वापर जेवढा चांगला आहे तेवढा वाईटही आहे शालेय जीवनात तुम्ही तुमच्या करिअरवर लक्ष द्या आई वडील व तुमची स्वप्ने तुम्ही साकार करा प्रमुख दिवाणी न्यायाधीश एस, एम ,घुगे हे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरामध्ये आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते .
तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ संघ सांगोला व ग्रामपंचायत वाटंबरे यांच्या संयुक्त विद्यमानाने वाटंबरे येथे जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी १२मार्च रोजी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित केले गेले होते .
या शिबिराचे उद्घाटन सांगोला येथील प्रमुख दिवाणी न्यायाधीश एस, एम, घुगे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी सहदिवाणी न्यायाधीश के,बी, सोनवणे सह दिवाणी न्यायाधीश एस. एस .साळुंखे ,सांगोला बार विधीज्ञ संघ अध्यक्ष ॲड.डी.बी. घाडगे, यावेळी उपस्थित होते.
या शिबिरात बालविवाह प्रतिबंध कायदा, आंतरराष्ट्रीय महिला दिन, जागतिक जल दिन, महिलांचे घरगुती संरक्षण, हिंसाचार कायदा ,कामाचे ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ या विषयावरती विविध मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी सरपंच किरण पवार, उपसरपंच मोनिका निकम, सर्व ग्रामपंचायत सदस्य , श्री छत्रपती प
हायस्कूल ज्युनियर कॉलेज प्रशालेचा मुख्याध्यापिका निता पवार प्रशालेतील विद्यार्थि, शासकीय कर्मचारी,महिला बचत गटातील सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतीनीस,आशा वर्कर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ या शिबिरास उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ॲड. एम.यु.डबीर आभार प्रदर्शन प्रतीक पवार यांनी केले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा