Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, ११ मार्च, २०२४

मन निरोगी राहण्यासाठी सात्विक आहाराची गरज -कोळेकर महास्वामीजी*

 *मन निरोगी राहण्यासाठी सात्विक आहाराची गरज -कोळेकर महास्वामीजी* 


 *शिक्षक पात्र विद्यार्थी सत्कार संपन्न* 

नाझरे प्रतिनिधी

               मानवाचे मन अतिशय चंचल आहे त्या स्थिर करण्यासाठी अध्यात्माची तर मन निरोगी राहण्यासाठी सात्विक आहाराची गरज आहे. परंतु सध्या फास्ट फूड कडे अधिक लक्ष आहे त्यामुळे आरोग्य व मन ही बिघडते . व शिक्षक पात्र विद्यार्थ्यांना आमचा आशीर्वाद आहे असे कोळेकर महास्वामीजी यांनी वीरभद्र मंदिरात आशीर्वाचनात सांगितले. सुरुवातीस महास्वामींचा सत्कार अन्नदाते रावसाहेब खोकले यांच्या हस्ते करण्यात आला.

              शिक्षक पात्र विद्यार्थी प्रणव राज रविराज शेटे, प्रदीप वसंत पाटील, अमर कादर तांबोळी, यशवंत अण्णा खरात, अमित नारायण खंडागळे तर देश सेवेसाठी सैन्य दलात दाखल झालेले सिद्धार्थ राजकुमार पाटील या सर्वांचा आदर्श मुख्याध्यापक सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी यांच्यातर्फे व महास्वामींच्या शुभ हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींना श्यामची आई पुस्तक, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

              यावेळी माजी सरपंच राजकुमार पाटील, अशोक पाटील गुरुजी, रविराज स्वामी, संजय रायचूरे, नंदकुमार रायचूरे, शिवाजी स्वामी, नंदकुमार ढोले, मुकुंद पाटील, महालिंग पाटील, भारत तेली, राहुल स्वामी, शरद स्वामी, बाळासो स्वामी, भीमसेन पाटील, सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी, खोकले परिवार, भक्तमंडळी, महिला वर्ग उपस्थित होता. सूत्रसंचालन सेवानिवृत्त शिक्षक शिवय्या स्वामी तर आभार रविराज शेटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart