Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, ६ फेब्रुवारी, २०२४

पंढरपूर येथे भाजपचे गाव चलो अभियानास सुरुवात.

 पंढरपूर येथे भाजपचे गाव चलो अभियानास सुरुवात.



आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेल्या कामांची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांनी सर्व सामान्यजनते पर्यंत पोहोचवावी यासाठी *गाव चलो  अभियान* सुरू करण्यात आले आहे.


या अभियानांतर्गत मंगळवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२४ रोजी  कृषी उत्पन्न बाजार समिती पंढरपूर येथे  भाजपा पंढरपूर दक्षिण मंडलाच्या  वतीने  गाव चलो अभियान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते  या कार्यशाळेस माढा लोकसभा निवडणुक प्रमुख  मा. आ. श्री.प्रशांत परिचारक साहेब , माढा लोकसभा समन्वयक मा.श्री.राजकुमार नाना पाटील साहेब, जिल्हाध्यक्ष मा.श्री चेतनसिंह केदार - सावंत साहेब, यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस मा.सचिन शिंदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप,गाव चलो अभियान  जिल्हा संयोजक लक्ष्मण केंकान,माढा लोकसभा विस्तारक मा.श्री.अनंत राऊत ,पंढरपूर मंडल अध्यक्ष भास्कर कसगावडे, विधानसभा  विस्तारक वारपे ,सर्व सुपर वॉरियर्स ,गाव चलो अभियान प्रवास कार्यकर्ते  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart