चिणके येथे समृद्ध गाव व पर्यटन स्थळ निर्मितीच्या उद्देशाने वृक्षारोपण.
सांगोला तालुका चिणके येथे बुधवार दि ७ फेब्रुवारी रोजी समृद्ध गाव व पर्यटन स्थळ निर्मितीच्या उद्देशाने वृक्षारोपण करण्यात आले.
या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा. आमदार सुभाष बापू देशमुख व भाजप युवा मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष गजानन भाकरे हे उपस्थित होते. या कार्यक्रमा वेळी गजानन भाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना चीणके गावाविषयी गौरवोद्गार काढले .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच नाथा खंडागळे होते.या कार्यक्रमाची प्रस्तावना उपसरपंच मोहन मिसाळ यांनी केले व आभार प्रदर्शन विनायक मिसाळ यांनी केले. सदर कार्यक्रमास भीमराव मिसाळ , प्रकाश मिसाळ, तानाजी कवठेकर अशोक शितोळे डॉ. गणपतराव मिसाळ सुभाष पाटील डॉ. रामहरी मिसाळ, गोपाळ मिसाळ, माजी सरपंच साहेबराव मिसाळ, सुरेश मिसाळ ,शरद मिसाळ, लक्ष्मण मिसाळ यासह अनेक मान्यवर व चिणके ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments