Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बॉडीबिल्डर संकेत संजय काळे ठरला नॅशनल चॅम्पियन

बॉडीबिल्डर संकेत संजय काळे ठरला नॅशनल चॅम्पियन.

{केरळ येथील स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक*}

सांगोला (प्रतिनिधी) : ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक मेन चॅम्पियनशिप २०२३-२४ या स्पर्धेत सांगोला तालुक्यातील बॉडीबिल्डर संकेत संजय काळे याने रौप्य पदक जिंकून नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून उज्वल यश संपादन केले आहे. ही स्पर्धा रविवार (ता. ४ फेब्रुवारी ) रोजी केरळ राज्यातील युनिव्हर्सिटी ऑफ कालिकत येथे संपन्न झाली.

या स्पर्धेत देशातील सर्व युनिव्हर्सिटीचे बॉडीबिल्डर सहभागी झाले होते. त्यात सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणेचे नेतृत्व करत या स्पर्धेत सहभाग नोंदवून संकेतने दुसरा नंबर मिळवून शालेय नॅशनल चॅम्पियनशिपवर आपले नाव सुवर्ण अक्षराने नोंदवले आहे. गेल्या वर्षी देखील याच स्पर्धेत संकेत याने तिसरा क्रमांक मिळवला होता.

या यशाबद्दल सर्व स्तरामधून क्रीडाप्रेमी, पालक, सामाजिक कार्यकर्ते व नेतेमंडळी यांचे कडून त्याचे कौतुक होते आहे. यापूर्वीही इंडियन बॉडी बिल्डर अँड फिटनेस फेडरेशनने आयोजित केलेल्या इंटरनॅशनल बॉडी बिल्डिंग स्पर्धेत ही जुनियर "भारत श्री" होण्याचा मान बॉडीबिल्डर संकेत संजय काळे यांनी मिळवला आहे.


No comments