विकसित भारत संकल्प योजनेच्या चित्ररथाचे नाझरे येथे स्वागत.
विकसित भारत संकल्प योजनेच्या चित्ररथाचे नाझरे येथे स्वागत.
वाटंबरे /प्रतिनिधी: केंद्र सरकारच्या विविध योजनेची माहिती सांगणाऱ्या चित्ररथयात्रेचे श्रीधर स्वामी यांच्या नाझरे या पावन भूमीत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारणी सदस्य नंदकुमार रायचुरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पी एम किसान योजना,जन धन योजना, घरकुल योजना, उज्वला गॅस योजना तसेच शासनाचे विविध योजनेची माहिती यावेळी त्यांनी दिली.
यावेळी चित्ररथाचे ग्रामपंचायत सदस्य गणि काझी व भाजपचे जिल्हा कार्यकारणी सदस्य नंदकुमार रायचुरे यांच्या हस्ते पुजण करण्यात आले. या चित्ररथाच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनाची माहिती ग्रामपंचायत स्तरावरील शासनाच्या योजना, पशुधन, महिला बचत गट ,आरोग्य विभाग, कृषी विभाग तसेच केंद्र शासनाचे राज्य शासनाच्या विविध योजनेचे विकसित भारत संकल्प रथातून व्हिडिओ चित्रफीत द्वारे माहिती देण्यात आली.

No comments