डाळिंबावर प्रक्रिया करणारा उद्योग लवकरच सांगोला तालुक्यात उभारणार;खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर..
डाळिंबावर प्रक्रिया करणारा उद्योग लवकरच सांगोला तालुक्यात उभारणार;खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर..
{अजनाळे येथे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर,आ शहाजी बापू पाटील,आ दीपक आबा साळुंखे पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ संपन्न.}..
अजनाळे: प्रतिनिधी : सांगोला तालुका हा पिढ्यानपिढ्या दुष्काळी तालुका म्हणून ओळख आहे परंतु गेल्या चार वर्षाच्या काळामध्ये या भागातील पाण्याच्या सर्व योजना जवळपास मार्गी लागल्या आहेत यापुढे या तालुक्यातील निवडणुका पाणी प्रश्नावर होणार नाहीत या तालुक्यामध्ये नेतृत्वाचा दुष्काळ आहे कर्तुत्वाचा दुष्काळ नाही या भागातील डाळिंबाने जगातील बाजारपेठेमध्ये आपल्या गावाची वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यामुळे डाळिंबावर प्रक्रिया करणारा उद्योग लवकरच या तालुक्यामध्ये निर्माण केला जाणार असल्याचे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.
काल रविवार दि १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता टेंभू उपसा सिंचन योजनेमधून अतिरिक्त आठ टीएमसी पाणी व १९ वंचित गावांना एक टीएमसी पाणी मंजूर केल्याबद्दल खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अँड आ शहाजी बापू पाटील, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड, तानाजी काका पाटील, दादा लवटे, गुंडा दादा खटकाळे, विजय शिंदे, सागर पाटील, प्रकाश सोळशे, सुभाष इंगोले, पांडुरंग मिसाळ, महादेव पवार, माऊली राऊत, चेतन सिंह केदार, आनंद घोंगडे, अरुण बिले, विजय पवार, अतुल पवार सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजय दादा येलपले, सरपंच सुभद्रा कोळवले, उपसरपंच बापू कोळवले, यांच्यासह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, मान नदी, कोरडा नदी, नीरा उजवा कालवा, टेंभूचे पाणी सर्व भागातून या तालुक्याला पाणी मिळाले आहे. राज्यामध्ये दुधाचा दर वाढवुन शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे हे आग्रही मागणी आम्ही शासनाकडे केली होती. या मागणीचा शासनाने तात्काळ पाच रुपये दर देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले आहे.
या वेळी आ शहाजी बापू पाटील आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, या तालुक्यातील पाण्याचा पहिला प्रश्न १९६७ साली कै काकासाहेब साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यातील वाड्यावसत्यावर जाऊन पाण्याची चळवळ गतिमान केली. उजनीचे पाणी पंधरा दिवसात येणार असुन या भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. सांगोला तालुक्याला पाणी देण्यासाठी कोण आडवा आला तर त्याला आडवा केला जाईल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांनी या भागाला पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. माणनदी मध्ये वर्षातून तीन वेळा टेंभूचे पाणी सोडून नदीकाठाच्या गावांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून त्यामुळे येथील शेतकरी सुखी समाधानी होणार आहे. तालुक्याच्या राजकारणामध्ये दीपक आबा आणी मी एकत्रच असून कार्यकर्त्यांनी चिंता किंवा काळजी करण्याचे काही कारण नाही योग्य त्यावेळी आम्ही दोघे योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी मा आ दीपक आबा साळुंखे पाटील आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की, कै सुरेश येलपले यांनी पाण्यासाठी क्रांती केली आहे सुरेश येलपले यांचे योगदान महत्त्वाचे असून अजनाळे हे गाव रोजगार हमीच्या कामावर 100% जाणारे हे गाव असून या गावाने डाळिंब उत्पादनाच्या बाबतीमध्ये क्रांती केली असून तालुक्यातील एक ही गाव पाण्यापासून वंचित ठेवणार नाही टेल टू हेड पाणी देण्यासाठी बापू आणि मी प्रयत्न करणार आहे ज्यावेळी येथील बळीराजा अडचणीत असेल त्या बळीराजाला मदत करण्यासाठी आम्ही वेळोवेळी प्रयत्न केला गेला आहे दूध दर वाढ संदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित पवार यांच्याशी बैठक लावून या बैठकीमध्ये पाच रुपये दरवाढ देण्यासाठी आम्ही भाग पाडले अजनाळे गावातील कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल..

No comments