वाटंबरे खंडोबा यात्रेनिमित्त राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा.
महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये प्रसिद्ध असलेले सांगोल तालुका वाटंबरे येथील जागृत देवस्थान खंडोबा यात्रेनिमित्त जय मल्हार क्रीडा मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे रविवार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल चे सामने आयोजित केले गेले आहेत. या सामन्यामधील विजेत्या असणाऱ्या संघांना खालील प्रमाणे बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत प्रथम बक्षीस अकरा हजार रुपये, द्वितीय बक्षीस नऊ हजार एक,तृतीय बक्षीस पाच हजार एक, चतुर्थ बक्षीस पाच हजार रुपये,सहावे बक्षीस दोन हजार, सातवे बक्षीस दोन हजार, आठवे बक्षीस दोन हजार या प्रकारे विजेत्या संघांना बक्षीस दिले जाणार आहे तसेच वैयक्तिक बक्षीस ही यावेळी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेले आहेत.
या सर्व स्पर्धा गावातील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे या प्रशालेच्या ग्राउंड वर खेळवण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील, तालुक्यातील संघानी सहभाग नोंदवावा असे आव्हान जय मल्हार क्रीडा आयोजकाकडून करण्यात आले आहे .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा