जय मल्हार कला क्रीडा मंडळ वाटंबरे यांच्या वतीने भव्य राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धा संपन्न.
वाटंबरे / प्रतिनिधी : सांगोला तालुका वाटंबरे येथील श्रीक्षेत्र जागृत देवस्थान खंडोबा यात्रेनिमित्त राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेचे रविवारी दि १७ डिसेंबर रोजी जय मल्हार कला क्रीडा मंडळ यांच्यावतीने आयोजन केले गेले होते. या स्पर्धेसाठी २४ संघाने या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदविला होता. युथ फाऊंडेशन मनेराजुरी विरुद्ध सेक्रेटरी सेवन सांगली यांच्यामध्ये अंतिम सामना खेळला गेला .या अटीतटीच्या रोमांचक अंतिम सामन्यात युथ फाउंडेशन मनेराजुरी या संघाने विजेतेपद पटकावले सेक्रेटरी सेवन सांगली या संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
या राज्यस्तरीय शूटिंग हॉलीबॉल स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून भारतीय संघाचे कप्तान शिवछत्रपती पुरस्कार विजेते अमजद जेलर , जयंत खंडागळे माळशिरस भारतीय संघ खेळाडू , विजय जाधव एपीआय सातारा महाराष्ट्र राज्य खेळाडू , नितीन पाटील कडेपुर भारतीय संघ खेळाडू ,सुरज नाना चौगुले टेंभुर्णी महाराष्ट्र राज्य, सुशांत पवार , मनेराजुरी भारतीय संघ खेळाडू, अक्षय पवार मनेराजुरी भारतीय संघ खेळाडू आणि आमिर काजी माळशिरस सलग सात वर्ष महाराष्ट्र राज्य कप्तान हे सर्व खेळाडू व शूटिंग बॉलजेष्ठ खेळाडू या स्पर्धेसाठी उपस्थित होते. या सामन्याचे उद्घाटन वाटंबरे गावचे सरपंच किरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवप्रतिमेचे पूजन गावचे राष्ट्रीय माजी खेळाडू पिंटू पवार यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी वाटंबरे गावातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यातील सर्व क्रीडा प्रेमी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
चौकट: जय मल्हार कला क्रीडा मंडळ हे चाळीस वर्षे हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातून खेळाडू तयार करण्याचे काम करत आहे, या मंडळाचे कार्य वाखण्याजोगे आहे ज्या ग्राउंड वर मी खेळाडू म्हणून खेळून गेलो आज त्याच ग्राउंडवर मला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी मला संधी दिली त्यामुळे मी या मंडळाचा आभारी आहे .
शिवछत्रपती पुरस्कार विजेत
अमजद जेलर.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा