Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

आर. के. बहुउद्देशीय संस्था आणि स्पार्क मिंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वाटप.

 आर. के. बहुउद्देशीय संस्था आणि स्पार्क मिंडा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना मोफत साहित्य वाटप. 

पुणे /प्रतिनिधी :दिव्यांग म्हणजे त्यांच्यामध्ये एखादी दिव्यशक्ती असते आणि ते त्यांच्या लक्षात न आल्यामुळे हे दिव्यांग स्वतःला मागे पडतात. आणि आपल्याला काहीतरी कमी आहे या विचाराने त्यांच्यामध्ये विश्वास कमी होतो. परंतु दिव्यांग म्हणजेच त्यांच्यामध्ये एक चांगला गुणही असतो, आज त्यांना आर. के. बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आणि स्पार्क मिंडा यांच्या वतीने वाकर कुबडी, काठी अशा काही वस्तू त्यांना मोफत देण्यात आल्या.
 जेणेकरून त्यांचे पुढील भविष्य हे ते स्वतःच्या पायावर उभा राहून आणि एका आत्मविश्वासाने जगतील हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
    या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष आनंद साळुंखे प्रणव साळुंके भाग्यश्री साळुंके, नगरसेवक अविनाश बागवे, कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक सर, स्पार्क मिंडा फाउंडेशनच्या वतीने मृणाली कलकोटवार. 

महाराष्ट्र ऑडिटर संघटनेचे अध्यक्ष रामदास शिर्के, झेप फाउंडेशन पुणे( महाराष्ट्र राज्य) संस्थापक/ अध्यक्ष, दैनिक वृत्तपत्र बाळकडू पत्रकार कांता (भाऊ) राठोड, महा एनजीओ फेडरेशन चे चेतन शर्मा,पुना कॉलेजचे बाबा शेख आणि नसरुद्दीन सर इ. उपस्थित होते

No comments