Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

हॉटेल पांडेजी यांनी स्वखर्चाने माणकेश्वर मंदिरात बोअरवेल मारत भावीक भक्तासाठी केली पाण्याची सोय.

हॉटेल पांडेजी यांनी स्वखर्चाने माणकेश्वर मंदिरात बोअरवेल मारत भावीक भक्तासाठी केली पाण्याची सोय.

वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक मध्ये प्रसिद्ध असलेले तसेच गोवा ,सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी कर्नाटक,कोकण मधील वारकऱ्यांमध्ये मुक्कामासाठी प्रसिद्ध असलेले जागृत खंडोबा देवस्थान व माणकेश्वर मंदिरामध्ये पंढरपूरला वारीच्या निमित्ताने जात असताना दिंड्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवते या पाण्याची टंचाई लक्षात घेता वाटंबरे येथील रत्नागिरी नागपूर हायवे वरील पर राज्यातून येऊन हॉटेल व्यवसायात उत्तम भरारी घेणारे हॉटेल पांडेजी यांनी ही अडचण लक्षात घेऊन त्यांनी माणकेश्वर मंदिर या ठिकाणी स्वखर्चाने बोअरवेल मारत खंडोबा देवस्थान व माणकेश्वर मंदिरामध्ये येणाऱ्या भाविक भक्तांसाठी तसेच वारकऱ्यांसाठी ग्रामस्थांसाठी पाण्याची सोय करून दिली.
त्यानी केलेल्या या कामाचे वाटंबरे ग्रामस्थ तसेच भाविक भक्तांमधून त्यांचे स्वागत केले जात आहे.

No comments