वाटंबरे/प्रतिनिधी:
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती सांगोला तालुका अनकढाळ टोल नाका येथील बंडगर पाटी या ठिकाणी मारुती स्विफ्ट डिझायर कार पलटी झाल्याने कार मधील दोघेजण मृत्युमुखी व तिघेजण जखमी झाल्याची घटना सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी घडली.
खालील घटनेचे सविस्तर वृत्त असे की तेलंगणा राज्यातील (प्रशांती नगर कौतुकुडू) येथील अल्ताफ शफि शेख वय(22) येथील रहिवाशी असून ते व त्याचे मित्र गरीगा पवनकुमार, रेहान महमद, अलीम महमद, आरफान आण्णा रेड्डी, सय्यद समृद्धीन तौशन कुमार, शिवशंकर रेड्डी , इमरान शेख , गौतम असे सर्वजण मित्र दोन गाड्यांमध्ये गोवा येथे पर्यटनासाठी गेले होते. गोवा येथून पर्यटन करून तेलंगणाकडे येताना अनकाढाळ टोल नाक्याजवळ सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी रात्री 1 वाजुन 30 मिनिटाच्या सुमारास अल्पोपहार घेऊन निघालो होते. आय टेन या गाडीमध्ये काही मित्र बसले दुसरी स्विफ्ट डिझायर गाडी नं. TS-35-G-1906 या गाडीमध्ये शरिफ पवनकुमार, रेहान महमद, अलीम महमद, आरिफान आण्णा रेड्डी, सय्यद खमरुद्दीन असे बसून निघाले होतो.
स्विफ्ट डिझायर गाडी हा सय्यद खमरुद्दीन चालवत होता. त्यातली एक गाडी पुढे गेली होती त्यांना रात्री 02.00 वा. सुमारास सोबत असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात झाला आहे असा फोन आला. तेव्हा त्यानी परत येऊन पाहिले असता स्विफ्ट डिझायर गाडी नं. TS-35-G-1906 ही अनकढाळ टोल नाक्याच्या पुढे बंडगर पाटीच्या जवळ खड्ड्यात पलटी होऊन अपघात झालेला दिसून आला या वेळी गाडीतील जखमी झालेले दिसून आले.
यावेळी अपघातातील सर्व जखमींना राष्ट्रीय महामार्गाच्या ॲम्बुलन्सने सोलापूर येथील सी एन एस या हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले त्यात पवनकुमार व्यंकटेश कुमार गरीगा वय 22 राहणार कोली लाईन कौतुगुडम व रेहान मोईन महमद वय 20 वर्षे रा. नसरापूर जिल्हा मेधक राज्य तेलंगणा हे उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले .
अलीम महमद, आरिफान आण्णा रेड्डी, सय्यद खमरुद्दीन यांच्यावर खंडागळे हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरता सीएनएस हॉस्पिटल सोलापूर येथे घेऊन गेल्याचे समजले आहे. अल्ताफ शेफी शेख यांनी या अपघाताची नोंद सांगोला पोलीस स्टेशनला केली आहे. या अपघाताचा पुढील तपास सांगोला पोलीस स्टेशन करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा