पोलीस पाटील ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे :पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन
वाटंबरे/ प्रतिनिधी -
पोलीस पाटलांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून, प्रत्येक गावातील माहिती वेळोवेळी पोलीस स्टेशनला सांगणे गरजेचे आहे व पोलीस पाटील हा ग्रामस्थ व पोलीस प्रशासनातील महत्त्वाचा दुवा आहे असे मत नूतन पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन यांनी नाझरे दूरक्षेत्र कार्यालयात सत्कार प्रसंगी मत व्यक्त केले. सांगोला तालुक्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित असून, मी नाझरे पोलीस स्टेशनला नव्याने रुजू झालो व पोलीस पाटलांनी माझा सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे स्वागत व आभार मानतो असेही पोलीस उपनिरीक्षक सिकंदर वर्धन यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी त्यांनी पोलीस पाटलांची आढावा बैठक घेतली.
सदर प्रसंगी पोलीस नाईक सुजित जाधव, पो.हे. कॉन्स्टेबल संजय भानवसे, पोलीस पाटील लक्ष्मण बनसोडे, संतोष भडंगे, सीता देवी पाटील, पांडुरंग पवार, वनिता कोकरे, रामचंद्र चौगुले, विकास आदाटे, संध्या नलवडे, गोपाळ जाधव, मंगेश जंवजाळ, विजय वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे इ. उपस्थित होते. शेवटी पोलीस नाईक सुजित जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा