Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १७ मे, २०२६

नाझरे येथे वळण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी.

नाझरे येथे वळण रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी.

नाझरे : येथील साठे नगर परिसरातील वळण रस्त्यावर वारंवार लहान-मोठे अपघात घडत असल्याने संबंधित ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. आटपाडी सांगोला या मुख्य रस्त्यावर साठे नगर परीसर येत असल्याने या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. विशेषतः दुचाकीस्वार आणि चारचाकी वाहनचालक भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याने वळणावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यापूर्वीही काही किरकोळ अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या असून भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन संबंधित ठिकाणी गतिरोधक बसवावेत तसेच इशारा फलक लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लवकरात लवकर आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart