Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, १७ जानेवारी, २०२६

ई पीक पाहणी नोंदणीत तांत्रिक अडचणी : वाटंबरे येथील शेतकऱ्यांतुन नाराजीचा सूर.

 ई पीक पाहणी नोंदणीत तांत्रिक अडचणी : वाटंबरे येथील शेतकऱ्यांतुन नाराजीचा सूर. 



 रब्बी पिकाचे  ई पीक पाहणी द्वारे पिक पेरा नोंदविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याकडून होत आहे. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल मधुन ई पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून आपल्या पिक पेऱ्याची नोंदणी करायची आहे परंतु त्यातील तांत्रिक अडचणी मुळे शेतकऱ्यांना पिक पेरा नोंदविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.  वाटंबरे तालुका सांगोला येथील शेतकऱ्याना ई पीक पाहणी द्वारे पिक पेरा नोंदविताना मोठ्या प्रमाणामध्ये तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे स्वतःच्या शेतात उभे राहून पीकाचे छायाचित्र घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्याच्या शेतिपासुन लोकेशन दोन ते तिन किलोमीटर अंतर दाखवत असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे त्यांना आपल्या स्वतःच्या पिकाची नोंद करता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पीक पेरा नोंदवण्यासाठी विलंब होत आहे  याप्रकरणी सांगोला तहसीलदार यांनी लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.


संक्षिप्त स्वरूपात: 

मी माझ्या शेतात ई पिक पाहणी अँप द्वारे पिक पेरा नोंदवण्यासाठी गेलो असताना  माझ्या शेती पासुन  य.मंगेवाडी या गावच्या हद्दीत क्षेत्र दाखवत असल्यामुळे  छायाचित्र घेण्यासाठी अडचण येत आहे त्यामुळे पिक पेरा नोंदविताना विलंब होत आहे.


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart