Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, १८ जानेवारी, २०२६

4 ""झेन जीच्या जमान्यात आदर्शाचा सोहळा! प्राध्यापक, डॉक्टर,एडवोकेट

 4   ""झेन जीच्या जमान्यात आदर्शाचा सोहळा!

प्राध्यापक, डॉक्टर,एडवोकेट राम पणदूरकर ,ऐशी वा वाढदिवस आगळा!! 

सत्तरीत पोचलेल्या शिष्यानीं, ऐशीतील गुरुची केली पाद्य पूजा!!! 



कोल्हापूर. : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, येथील सेवानिवृत्त भूगोल विभाग प्रमुख, प्रसिद्ध समाजसेवक ,दानशूर ,प्राध्यापक डॉक्टर, राम पणदूरकर यांचा ऐंशी वा वाढदिवस, सांगलीतील, हरिपूर ,बाग गणेश मंदिरात , वेदोक्त ,शास्त्रोक्त पद्धतीने त्यांच्या, 1977 ते 1979एम.ए.भूगोल, विद्यार्थ्यांनी पाद्य पूजा करून संपन्न केला.. त्याचे बहुसंख्य विद्यार्थी, त्यांच्या कुटुंबीयांसोबत उपस्थित होते. पाद्यपूजेचे संयोजन केले, त्यांचे शिष्य निरूपणकार,

 श्री शामकांत उमराणी यांनी ,

तर गुरुची पाद्यपूजा करण्याचा मान सौ.व श्री नरसू वाघमोडे यांना मिळाला. स्वागत प्राध्यापक दिलीप गायकवाड, तर पाद्यपूजेची माहिती श्री माधव जोशी यांनी दिली .

सो.माई पणदूरकर, यांचे हस्ते महिला विद्यार्थिनींना ,संक्रांत वाण प्रदान केले .


दुपारच्या सत्रात सातारचे,

 सेवानिवृत्त प्राचार्य, डॉक्टर डीजी गाताडे व उपस्थित शिष्यानीं डॉक्टर पणदूरर यांची ""माझे जीवन गाणे ""या शीर्षकाखाली 80 प्रश्न विचारून सरांचा जीवनप्रवास उलगडला .भूगोल, कायदा ,राज्यशास्त्र सोबत लोकसेवा आयोगापर्यंत ज्ञानप्रसार केलेल्या सरांनी समर्पक उत्तरे दिली .

""सारे काही देशाचे आहे, ज्या देशाने मला दिले त्यालाच मी परत दिले . डॉक्टर पणदूरकर यांनी साठ लाख रुपये शिवाजी विद्यापीठास, पाच लाख राष्ट्रीय संरक्षण निधीसाठी व दहा लाख पंतप्रधान आपत्कालीन निधीसाठी गेल्या दोन वर्षात दिले. त्याचा उल्लेख या कार्यक्रमात झाला. ""देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे,, एके दिवशी, घेणाऱ्याने ,देणाऱ्याचे हात घ्यावेत... अशी इच्छा पणदूरकर यांनी व्यक्त केली .

शेवटी एक तास करमणुकीच्या कार्यक्रमात डॉक्टर पणदूरकर 

यांनी काही कविता सादर केल्या. इतर श्रोत्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. सूत्रसंचालिका सुनंदा माने जाधव ,यांनी फिरकी घेणारे, प्रश्नातच उत्तर सापडणारे ,"चकवा प्रश्न" विचारले .शेवटी सुनंदा माने यांनी आभार मानले आणि पसायदानाने कार्यक्रम संपन्न झाला.

 सदर कार्यक्रमास जवळजवळ साठहून अधिक विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय व नातवंडे पण उपस्थित होती... 

श्री उमराणी, गायकवाड ,माधव जोशी ,गाताडे, दळवे, काळे, जाधव ,पाटील, पवार, वसमाने

 पाटील, शामराव पाटील, वाघमारे, वाघमोडे ,

अनुराधा मादनाईक ,अर्जुन वाघ, पोळ इत्यादी शिष्यांची प्रमुख उपस्थिती होती ..

सध्याच्या शिक्षकाला अतिरिक्त कामे लावून पालक व विद्यार्थ्यांकडून त्रास देणारी कृती करण्याच्या सध्याच्या पिढीने हा आदर्श आत्मसात करावा .आणि शिक्षकाला मान देऊन सरस्वती देवतेची पूजा करावी ..असा संदेश ही पाद्य पूजा देते .

असे कार्यक्रम फक्त आषाढ पौर्णिमेला न करता, सतत केल्यास समाजावर त्याचा अनुकूल परिणाम होऊ शकतो.

श्री एकनाथ जाधव ,सुनंदा माने वसमाने, माधव जोशी इत्यादींनी कार्यक्रमाचे संयोजन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart