नंदकुमार नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी मारुती इंगोले देशमुख यांची बिनविरोध निवड.
सांगोला येथील नंदकुमार नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक सोमवार दि. 3 मार्च रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी सर्वांनुमते मारुती इंगोले देशमुख यांची चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीची प्रक्रिया सहकार विभागाचे अधिकारी मा. शेख साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . या वेळी संस्थेचे सहकार विभागाचे मा. अधिकारी चेअरमन हरिदास फुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या वेळी संस्थेचे संचालक मंडळाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा