Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, ११ मार्च, २०२५

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेमळा या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष 2025 मोठया उत्साहात साजरे

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसलेमळा या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष 2025 मोठया उत्साहात साजरे 



       सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोष 2025 शनिवार दिनांक 8/3/2025 रोजी रात्री 8 ते 12 या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री शरद मिसाळ, वाटबरे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री काझी सर, कमलापूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री पवार सर आणि ग्रामपंचायत चिनके चे उपसरपंच श्री मोहन मिसाळ सर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वाटबरे, कमालापूर केंद्रातील बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. स्नेहासंमेलनास शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री पांढरे सर, कोळी सर, अमोघ कोळी सर, ढोले सर तसेच शिक्षक संघाचे शिक्षक नेते संजय गायकवाड, संजय काशीद पाटील, डोंगरे सर, निंबाळकर सर तसेच तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांनी भेट दिली. चिनके आणि भोसलेमळा परिसरातील, पालक, तसेच नागरिक या कार्यक्रमास उपस्थित होते या कार्यक्रमात शिवजन्मापासून ते शिवराज्याभिषेक पर्यंत चा सोहळा, करते मी मुजरा लावणीसह, खंडोबाची, बाळूमामाची गाणी यांना प्रेक्षकांनी विशेष दाद दिली. या शाळेचे मुख्याध्यापक श्री हणमंत पवार सर यांनी सर्वांचे आभार मानले तसेच ग्रामस्थ आणि पालक यांनी या शाळेतील  पवार सर, काशीद सर व देसाई मॅडम या सर्वांचा फेटा, शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart