Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

रविवार, २३ फेब्रुवारी, २०२५

ग्रामपंचायत वाटंबरे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वाटप .

 ग्रामपंचायत वाटंबरे येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वाटप .


वाटंबरे/प्रतिनिधी--  ग्रामपंचायत वाटंबरे येथे प्रधानमंत्री आवास योजना सन २०२४/२५ टप्पा क्रमांक 2 ग्रामीण घरकुल लाभार्थी यांना मंजुरी पत्र वाटप व पुणे येथे या संदर्भात आयोजित केलेल्या केंद्रीय मंत्री मा.अमित शहा भारत सरकार यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व मान्यवर मंत्रिमहोदयांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण कार्यक्रम शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी वाटंबरे येथे संपन्न झाला .

ग्रामपंचायत वाटंबरे येथे ७३ घरकुल लाभार्थ्यांना आमंत्रित करून सर्वप्रथम त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .यावेळी चोपडी ग्रामपंचायत अधिकारी संजय मोहिते यांनी सदर घरकुलाच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल  उपस्थित लाभार्थी यांना माहिती दिली.या वेळी पालक अधिकारी म्हणून वैशाली पवार  उपस्थिती होत्या.

यावेळी या कार्यक्रमासाठी  सरपंच  नामदेव पवार, उपसरपंच मोनिका निकम, ग्रामसेवक गुळीक, मा, सरपंच सुब्राव बापू पवार,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनाजी पवार, सोसायटी चेअरमन खंडू पवार ,ग्रामपंचायत सदस्य शिवाजी माळी, नारायण पवार, हनमंत निकम सर ,मा. तंटामुक्ती अध्यक्ष प्रतीक पवार, पत्रकार दत्तात्रय पवार, आप्पासाहेब गेजगे, दिनेश धनवडे,   ग्रामपंचायत सदस्य,  गावातील आजी-माजी पदाधिकारी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक , घरकुल लाभार्थी व ग्रामपंचायत कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart