Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

लोकमंगल बँक व लोकमंगल पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सांगोल्यात उद्योजक व ग्राहक स्नेह संवाद मेळावा

 लोकमंगल बँक व लोकमंगल पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सांगोल्यात उद्योजक व ग्राहक स्नेह संवाद मेळावा



सांगोला (प्रतिनिधी) :-


लोकमंगल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूर व लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक १३ ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता रामकृष्ण गार्डन व्हिला सांगोला मंगळवेढा रोड सांगोला येथे उद्योजक व ग्राहक स्नेह संवाद मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक अॅड. गजानन भाकरे यांनी दिली.यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ कर्जविषयक माहिती, आई कर्ज योजना पर्यटनविभाग माहिती,ओबीसी महामंडळ कर्ज विषयक माहिती, जगज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळ कर्ज विषयक माहीती देण्यात येणार आहे.


यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक योगेश वाघ, पर्यटन विभाग महाराष्ट्र शासनप्र कल्पधिकारी मयूर नांद्रे, प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग योजनेचे क्षेत्रीय अधिकारी मन्सूर पठाण, प्रधानमंत्री फूड प्रोसेसिंग योजनेच्या जिल्हा संसाधन व्यक्ती समाधान खूपसे हे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्ष स्थान लोकमंगल समूहाचे संस्थापक अध्यक्ष तथा आ. सुभाष देशमुख हे भूषवणार आहेत.तरी या उद्योजक व ग्राहक स्नेहसंवाद मेळाव्यास सांगोला तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन लोकमंगल पतसंस्थेचे चेअरमन गुरण्णा तेली, सांगोला शाखेचे पालक संचालक विजय कुलकर्णी, लोकमंगल पतसंस्था सांगोलाचे तज्ञ संचालक अॅड. गजानन भाकरे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart