Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

ऊन, वारा, पावसात काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याची शासनाने दखल घेऊन महामंडळ स्थापन केले अध्यक्ष :-रविराज शेटे*

 *ऊन, वारा, पावसात काम करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याची शासनाने दखल घेऊन महामंडळ स्थापन केले अध्यक्ष :-रविराज शेटे* 



सांगोला प्रतिनिधी 

         ऊन, वारा, पाऊस याचा विचार न करता, वृत्तपत्र क्षेत्राचा कणा असलेले आणि वाचकांना ज्ञानाचा खजिना वाटणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्याच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन केले त्यामुळे वृत्तपत्र विक्रेत्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे असे सांगोला तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी सांगितले. संघटनेचे माजी कोषाध्यक्ष गोरख भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर येथे विठ्ठलाचे साक्षीने, मंदिरासमोर वारकऱ्यांना पेढे वाटून व वृत्तपत्र विक्रेत्याला पेढे भरून आनंद व्यक्त केला. 


          या कामी संघटनेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र शासन, संपादक, पत्रकार, या सर्वांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत असे गोरख भिलारे यांनी यावेळी सांगितले. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र विक्रेता व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच सदर प्रसंगी संघटनेचे शेखर तेंडुलकर, सतीश लाड, नागेश काटकर, महादेव वाटाणे, शिवकुमार भावलेकर, संतोष कुलकर्णी, आनंद तेंडुलकर, शिरीष तेंडुलकर, संतोष कुलकर्णी, ज्ञानेश हरिदास इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart