Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०२४

महिला शक्ती संघटनेच्या वतीने अध्यक्ष रविराज शेटे व सचिव दत्तात्रय पवार यांचा सत्कार.

 महिला शक्ती संघटनेच्या वतीने अध्यक्ष रविराज शेटे व सचिव दत्तात्रय पवार यांचा सत्कार.  


सांगोला प्रतिनिधी :

        महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संचलित सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या नुकत्याच निवडी संपन्न झाल्या.  संघटनेतील नुतन  अध्यक्ष रविराज शेटे,  सचिव दत्तात्रय पवार,  यांचा महिला संघटनेच्या वतीने संघटनेच्या अध्यक्षा जयश्री सावंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ ,फेटा देऊन सत्कार करण्यात आला. 

         महिलावर होणाऱ्या  अन्यायाविरुद्ध ग्रामीण पत्रकार संघटनेतील  पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवीण्याचे  आव्हान महीला अध्यक्ष जयश्री  सावंत यांनी सत्कार समारंभ प्रसंगी केले .

या वेळी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी त्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वला बोराटे यांनी केले तसेच  पत्रकार संघटनेचे सचिव दत्तात्रय पवार यांनी आभार व्यक्त केले .

या वेळी महीला संघटनेच्या माधुरी माने , विद्या माने, मधुरा सावंत तसेच मोठ्या प्रमाणात महिला यावेळी उपस्थित होत्या.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart