Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

सोमवार, २७ मे, २०२४

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाटंबरे प्रशालेचा दहावीचा १०० % निकाल.

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाटंबरे प्रशालेचा दहावी चा १०० %  निकाल.
वाटंबरे / प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा पुणे विभागीय शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२४ चा निकाल  सोमवार दुपारी एक वाजता शिक्षण विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने जाहीर झाला .या परीक्षेमध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे प्रशालेचा शंभर टक्के निकाल लागला, विद्यार्थ्यांनी साला बाद प्रमाणे याही वर्षी घवघवीत यश प्राप्त केले.
या वर्षी सेमी इंग्रजी माध्यमातून माने वैभव समाधान या विद्यार्थ्यांने ९२.६०% मार्क मिळवून प्रशालेत व वाटंबरे केंद्रात प्रथम क्रमांक पटकाविला , पवार शिवतेज दिपक या विद्यार्थ्यांने व कु. काशीद सृष्टी अनिल या विद्यार्थिनीने ९२.४०% मार्क मिळवून प्रशालेत व केंद्रात द्वितीय क्रमांक मिळविला, कु. पवार गौरी बाजीराव या विद्यार्थिनीने ९०.२० टक्के मार्क मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवला.
मराठी माध्यमातून कु. पवार ज्योती प्रभाकर हीने ८६ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक , कु.नरळे साक्षी दत्तात्रय हिने ८३.४० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक कु.बजबळकर वैष्णवी संजय हिने८२.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. 
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ,प्राचार्य , पर्यवेक्षक,शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart