Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर वन विभागाची कारवाई.

 विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोवर वन विभागाची कारवाई. 



विनापरवाना लाकुड वाहतुक करणारा आयशर क्र. MH-11 AL 2930 या टेंपोवर वनविभागाने कारवाई करत कडुलिंब लाकुड मालासह गाडी जप्त केली. 

हि कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी  डोंगरगाव ता. सांगोला येथून दि. 26 मे 2024 रोजी केली. 

मौजे डोंगरगाव येथे मालकी क्षेत्रात कडुलिंब झाडांचे विनापरवाना वृक्षतोड करून विनापरवाना वाहतूक करत असताना वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला, वनपाल जुनोनी, वनरक्षक हटकर मंगेवाडी व वनमजूर जुनोनी यांनी कारवाई केली. मौ. डोंगरगाव येथे दि. 26 मे रोजी गस्त करत असताना सायंकाळी सहा वाजुन तिस मिनिटांच्या दरम्यान डोंगरगाव ते वाळेखिंडी रस्त्यावर वाहनांची तपासणी केली असता आयशर क्र. MH 11 AL 2930 यामध्ये जळावु कडूलिंब लाकुड 26.00 घमी मिळून आले. कडूलिंब झाडांची विनापरवाना वृक्षतोड करून विनापरना वाहतूक होत असल्याचे दिसुन आले  आयशर ड्राव्हर-संतोष बाजीराव वायदंडे रा. डफळापूर ता.जत जि. सांगली व्यापारी उत्तम गुलाब वायदंडे रा. कलोनी ता. आतणी जि. बेळगाव आयशर मालक विठ्ठल वसंत बजंत्री रा. कलोली ता.आथणी जि. बेळगाव या तिघांनी कडूलिंब झाडे विनापरवाना वृक्षतोड करून विनापरवाना वाहतूक करत असताना यांचेकडे वनविभागाचा वाहतूक पास नसल्यामुळे सदरचा आयशर कडूलिंब जळावु लाकुड मालासह जप्त करूनव वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला शेजारी ठेवण्यात आला आहे. आयशर मधील जळावु लाकडाची किंमत अंदाजे 30,000/- रु. आहे. वनविभागाचा वृक्षतोड परवाना घेतल्यानंतरच वृक्षतोड करावी. वनविभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी. अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक केल्यास वनविभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. प्रत्येक व्यक्तीने झाडांचे संरक्षण करावे. ज्या झाडापासुन धोका आहे अशी झाडे तोडण्यासाठी कार्यालयात अर्ज करावा. प्रत्येक माणसाला झाडापासुन एका दिवसाला 15 कि. ग्रॉ. ऑक्सीजन लागतो. ज्या झाडाची गोलाई साधारण 6 ते 7 फुट आहे अशी झाडे सात असल्यास एका माणसाला 15 कि.ग्रॉ. ऑक्सीजन मिळतो असे पर्यावरण तज यांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने झाडाचे संरक्षण करावे व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा. तसेच सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण फारच कमी आहे. वृक्षतोड बंद करून व जास्तीत जास्त वृक्षलागवड करून सांगोला तालुका दुष्काळ ग्रस्त मुक्त करता येईल असे आव्हान श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला यांनी केले आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. मालकी क्षेत्रात अवैध वृक्षतोड व अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर यांचा मोबाईल नंबर 9420378279 वर संपर्क साधावा, असे आव्हान केले आहे.

सदरची कारवाई मा. मुख्य वनसंरक्षक (प्रा) पुणे श्री. धैर्यशील पाटील व मा. सहा वनसंरक्षक (कॅम्पा), सोलापूर आली. सदरची कारवाई श्री. तुकाराम विठ्ठल जाधवर वनपरिक्षेत्र श्री. एन. आर. प्रवीणसाहेब, मा. उपवनसंरक्षक, सोलापूर श्री. बी. जी. हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात अधिकारी सांगोला, श्री.एस.एल. वाघमोडे वनपाल जुनोनी, वनरक्षक ह. मंगेवाडी श्री.ए.के. करांडे, तसेच वनमजूर आबासो खटके यांनी केली.


No comments