उदनवाडी /प्रतिनीधी : उदनवाडी येथील ग्रामदैवत मायाक्का देवीची यात्रा15मे 2024 ते20मे2024 यादरम्यान मोठ्या आनंदी व भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. दिनांक 15 मे 2024रोजी मायाक्का देवी यात्रेला सुरुवात झाली. 19मे 2024 रोजी मायाक्का देवी यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे नैवेद्याचा दिवस होता. मायाक्का देवी यात्रेदरम्यान रोज सकाळ व संध्याकाळ मायाक्का देवीची आरती संपन्न झाली. तसेच मायाक्कादेवी यात्रेनिमित्त मायाक्का देवी ओवीकार मंडळ उदनवाडी यांचा ओवीचा कार्यक्रम, पांडुरंग एकतारी भजनी मंडळ उदनवाडी यांचा एक तारी भजनाचा कार्यक्रम, शाहीर बबन गळवे व उत्तम गळवे यांचा देवीच्या गाण्यावर आधारित पोतराजाचा कार्यक्रम, भारुडाचा कार्यक्रम, शिवरत्न वाघ्या मुरळी पार्टी अजनाळे यांचा वाघ्या मुरळीचा कार्यक्रम हे भक्तिमय कार्यक्रम संपन्न झाले.दिनांक
20 मे 2024 रोजी महाप्रसादाने मायाक्का देवी यात्रेची सांगता झाली. उदनवाडी गावचे ग्रामदैवत मायाक्का देवीची यात्रा संपन्न करण्यासाठी मायाक्कादेवी यात्रा कमिटी उदनवाडी व उदनवाडी, काळामळा , वतवस्ती ,शिंगाडेमळा, झापाचीवाडी, कारंडेवाडी, मारकडमळा येथील सर्व भावीक भक्त ,माता भगिनी ,लहान थोर मंडळी, यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा