Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे आठवडी बाजार मरणावस्थेत .

 वाटंबरे आठवडी बाजार नामशेष होण्याच्या मार्गावर.



वाटंबरे /प्रतिनिधी :सांगोला तालुका वाटंबरे येथील आठवडी बाजार हा अजनाळे ,य.मंगेवाडी ,चिणके ,राजुरी, निजामपूर या आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध होता या बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असे .


या आठवडी बाजाराची आता मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली दिसून येत आहे व्यापाऱ्यांना बसण्यासाठी बांधण्यात आलेले कट्यांचे फक्त अवशेष उरलेले आहेत, सर्वत्र काटेरी झुडपे वाढलेली आहेत मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली आहे बाजारा साठी येणाऱ्या व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली  नाही .

राजुरी, चिणके ,या मंगेवाडी, अजनाळे या गावातुन व्यापारी वर्गाला बाजारात येण्यासाठी ग्रामपंचायत च्या वतीने त्यांना प्रोत्साहित केले जात आहे पण या गोष्टीला वाटंबरे येथील आठवडी बाजार हा अपवाद ठरत आहे त्यामुळे व्यापारी व ग्राहकांनी या बाजाराकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे त्यामुळे हा आठवडी बाजार आता अखेरच्या घटका मोजत आहे .  

गावच्या विकासासाठी गावाने एकत्र येऊन वाटंबरे ग्रामपंचायत ही बिनविरोध केली पण ग्रामपंचायत मध्ये कार्यरत असणारे सरपंच व सर्व सदस्यांना या गोष्टीचा विसर पडलेला दिसून येत आहे असे नागरिकांमधून बोलले जात आहे तरी ग्रामपंचायत वाटंबरे यांनी बाजार पटांगणाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून येणाऱ्या सर्व व्यापाऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देऊन वाटंबरे बाजाराला परत वैभव मिळवून द्यावे असे नागरिकांमधून बोलले जात आहे. 




चौकट: वाटंबरे येथील बाजारात बसण्यासाठी कट्टे नाहीत सर्वत्र काटेरी झुडपे आहेत ग्रामपंचायत वतीने या ठिकाणी कोणतीही सुविधा उपलब्ध केली गेलेली नाही.


व्यापारी वर्ग.


चौकट:  वाटंबरे आठवडी बाजाराच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून बाजार पटांगणातील विकास कामे केली जातील. बाजारात येण्यासाठी सर्व  व्यापाऱ्यांना प्रोत्साहीत करुण त्याना सर्व सुविधा उपलब्ध करून वाटंबरे आठवडी बाजाराला पूर्वीसारखे गत वैभव प्राप्त करून देण्याचा आम्ही सर्व ग्रामपंचायतच्या वतीने प्रयत्न करू.

 सरपंच.

नामदेव पवार.

No comments