*मा. आमदार दीपक आबा साळुंखे पाटील वाढदिवसाचे औचित्य*
*नाझरे येथे महिला दिनानिमित्त मुलींना सायकल वाटप*
नाझरे प्रतिनिधी
सांगोला तालुक्याचे लोकप्रिय मा. आमदा तज्ञर दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नाझरे तालुका सांगोला येथे महिला दिनानिमित्त शालेय मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.
सुरवातीस प्रास्ताविक दादासो हरिहर यांनी केले तर ना जातीभेद ना पक्षपातीपणा न करता गोरगरीब जनतेची सेवा आबा करतात व सायकल वाटपामुळे मुलीच्या चेहऱ्यावर हसू निर्माण झाले व त्यांना घरापासून शाळेत चालत जावे लागत होते तो त्रास कमी झाला असे मत राष्ट्रवादीचे नेते डॉक्टर राज मिसाळ यांनी व्यक्त केले. तर तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी आबांनी आतापर्यंत बरीच सेवा केली व आज सायकल वाटप करून मुलींच्या जीवनात आनंद निर्माण करून दिला. यापुढेही असाच वाढदिवस साजरा व्हावा असे मत पत्रकार रविराज शेटे यांनी व्यक्त केले.
अश्विनी बाबर, श्रद्धा मंडले, गौरी सावंत, धनश्री लवटे, श्रद्धा बंडगर, वैशाली काळे, दिव्या चव्हाण, सविता खांडेकर, प्रतिभा यादव, नीता टोणे इत्यादी मुलींना सायकल वाटप करण्यात आले. यावेळी बंडू मामा आदाटे, बसवेश्वर आदाटे, एकनाथ जाधव, फिरोज तांबोळी, पांडू वाघमारे, शिवाजी निंबाळकर, गणेश कोळेकर, बाबासो करांडे, पालक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. शेवटी सर्वांचे आभार नागेश रायचुरे यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा